गॅस लवकर संपतोय ? सोप्या ८ टिप्स, गॅसची होईल बचत... 

स्वयंपाकघरात रोज वापरला जाणारा गॅस सिलेंडर लवकर संपला, तर महिन्याचे बजेट बिघडू शकते.

काही सोप्या टिप्स फॉलो केल्यास गॅसची बचत होऊन तो जास्त दिवस वापरता येऊ शकतो.

गॅस चालू करुन भाज्या चिरणे किंवा इतर तयारी करणे टाळा. सर्व साहित्य गोळा करून मगच गॅस पेटवा. 

गॅसवर ओली भांडी ठेवल्याने गॅस अधिक लागतो. त्याऐवजी भांडी कोरडी करून ठेवल्याने गॅस बचत होईल. 

फ्रिजमधून काढलेले थंडगार पदार्थ किंवा भांडी लगेच गॅसवर ठेवू नये. त्याचे तापमान नॉर्मल झाल्यावरच गॅसवर ठेवावे. 

अन्नपदार्थ शिजवताना भांड्यावर झाकण ठेवा. यामुळे अन्नपदार्थ कमी वेळेत शिजेल आणि गॅसची बचत होईल. 

प्रेशर कुकरमध्ये अन्नपदार्थ शिजवल्याने वेळ आणि गॅस दोन्हीची बचत होईल. 

सारखा चहा किंवा गरम पाणी लागत असेल तर एकदाच थर्मासमध्ये भरून ठेवा. गॅसची बचत होईल. 

कोणताही अन्नपदार्थ शिजवताना भांड्याच्या पृष्ठभागाच्या हिशोबाने गॅसची फ्लेम ठेवा, यामुळे गॅसची बचत होईल. 

गॅसच्या फ्लेमकडे लक्ष द्या. फ्लेमचा रंग लाल - नारंगी असेल तर गॅसची गळती होते. फ्लेमचा रंग कायम निळाच असावा.

Click Here