रोजच्या रोज पोळी भाजी खाऊन कंटाळा आला तर हेल्दी आणि पोट भरीचा ऑप्शन म्हणजे पराठा.
गाजर आणि बीट पराठा. यामुळे फक्त रंग छान येत नाही तर, आयर्न, फायबर मिळते. नैसर्गिक गोडव्याची चव येते.
रताळ्याचे पराठे. रातळ्याला स्वतःचा गोडवा असतो. त्यामुळे यात मसाले घालून तिखट करू शकता. यात अँटीऑक्सिडन्ट आणि फायबर असते.
ब्रोकोली आणि चीझ पराठा. हा पराठा एकदम टेस्टी लागताे. वेळ कमी असेल तेव्हा झटपट तयार हाेताे. या पराठ्यातून भरपूर व्हिटामिन्स मिळतात.
मुग डाळ पराठा. हा पराठा पचायला खूप हलका असताे. आमटी, वरण खाण्यापेक्षा पराठा हा वेगळा पर्याय आहे. यातून प्राेटीन्स जास्त प्रमाणात मिळतात.
मिक्स व्हेज पराठा. यामध्ये गाजर, घेवडा, मटार याचबराेबर घरात असलेल्या भाज्यांचा वापर करू शकता. हा पराठ्यातून फायबर मिळते.
पनीर पालक पराठा. पालकची भाजी खायला मुलं नाकं मुरडतात. त्यावेळी हा पर्याय उत्तम आहे. प्राेटीन्सच्या बराेबरीने आर्यन आणि कॅल्शियम मिळते.
सत्तू किंवा कडधान्य, तृणधान्यापासून तयार केलेल्या पिठाचे पराठे करू शकता. यामुळे पाेट अधिक काळ भरलेले राहाते. हे पाैष्टिक आहेत.