रवा, बेसन लाडूंऐवजी फराळात करा पौष्टिक लाडूचे ६ प्रकार... 

बेसन आणि रव्याच्या लाडूंशिवाय, फराळाच्या ताटाची चव आणि पौष्टिकता वाढवणारे 'हे' ६ हटके लाडूचे प्रकार...

पौष्टिक आणि करायला सोपे असे काही खास लाडूचे प्रकार पाहूयात, जे यंदाच्या दिवाळीत नक्कीच करून पाहू शकता.

पोह्याचे लाडू हा झटपट होणारा आणि चविष्ट लाडूचा प्रकार. पोह्यातून मिळणारे कार्बोहायड्रेट्स आणि गूळ, साखर यातून मिळणारी ऊर्जा दिवाळीच्या फराळासाठी एक चांगला पर्याय आहे.

मुगाची डाळ प्रथिनांचा उत्तम स्रोत आहे, हे लाडू पचनास हलके व चविष्ट असतात.

 गव्हाचे लाडू हा पारंपारिक आणि पौष्टिक लाडूचा प्रकार आहे. तुपात भाजल्यामुळे ते अधिक चविष्ट व पौष्टिक होतात. 

मिश्र डाळीचे लाडू तयार करण्यासाठी चणा डाळ, मूग डाळ, उडीद डाळ यांचा वापर केला जातो. त्यामुळे हे लाडू प्रथिने आणि कॅल्शियमचा उत्तम स्रोत आहेत. 

बुंदीचा लाडू अधिक पौष्टिक करण्यासाठी साखरेच्या पाकाऐवजी गुळाचा पाक वापरू शकता, ज्यामुळे त्याला एक वेगळी चव आणि रंग येतो.

तांदुळाचे लाडू हा एक खास आणि झटपट तयार होणारा लाडूचा प्रकार. हा लाडू पचनास हलका आणि चवीला स्वादिष्ट लागतो.

Click Here