मूड स्विंग्सचा त्रास ? मग 'हे' ७ पदार्थ खा आणि व्हा झटपट हॅपी... 

दिवसभर कामाचा ताण, थकवा आणि चिडचिड यामुळे मूड बिघडतो, अशावेळी मूड फ्रेश करण्यासाठी खा 'हे' ७ पदार्थ...

डार्क चॉकलेट खाल्ल्याने शरीरात 'फील-गुड' हार्मोन्स तयार होतात, ज्यामुळे तुमचा मूड लगेच सुधारण्यास मदत होते.

बदाम, काजू, भोपळ्याच्या बिया आणि सूर्यफुलाच्या बिया शरीरात 'सेरोटोनिन' तयार करतात, जे मूड बूस्ट करण्यासाठी फायदेशीर असते. 

ओट्स हे फक्त प्रोटीनचा स्रोत नाहीत, तर ते मूड - स्विंग कमी करण्यासाठी आणि एनर्जी टिकवून ठेवण्यासाठी देखील बेस्ट पदार्थ आहे. 

दही आतड्यांच्या आरोग्यासाठी उत्तम असते. आपल्या पचनसंस्थेचा आणि मानसिक आरोग्याचा थेट संबंध असतो त्यामुळे दही खावं. 

केळ्यामध्ये व्हिटॅमिन B ६ भरपूर असते. हे मेंदूमध्ये 'डोपामाइन' आणि 'सेरोटोनिन' सोडण्यास मदत करते, ज्यामुळे मूड रिफ्रेश होऊन आनंदी वाटते.

स्ट्रॉबेरी किंवा ब्लूबेरी खाल्ल्याने शरीरातील दाह कमी होतो, ज्याचा संबंध नैराश्य, स्ट्रेस कमी होण्याशी जोडला जातो. 

कॉफी बिघडलेला मूड चांगला करण्यासाठी शरीरात हॅप्पी हार्मोन्स रिलीज करण्यास मदत करते, ज्यामुळे मूड चांगला होतो.

Click Here