महिलांनी राेज खा सुपर फूड, रहा फिट!

दिवसभरात अनेक गाेष्टी महिला करत असतात. बिझी शेड्यूलमुळे त्यांना स्वतःकडे पाहायला वेळ मिळत नाही. त्याचा परिणाम आराेग्यावर हाेताे. 

महिलांना स्वतःला फिट ठेवायचे असेल, तर महिलांनी आहारात नक्कीच या ५ गाेष्टींचा समावेश केला पाहिजे. 

राेज काळे मनुके खाल्ल्याने महिलांना नक्की फायदा हाेईल. हिमाेग्लाेबिन वाढण्यास मदत हाेते. हाडे मजबूत राहतात. 

आवळ्याचे सेवन केल्याने शरीर शुद्धीकरणास मदत हाेते. तसेच, केसांच्या समस्या कमी हाेतात. त्यामुळे महिलांनी आवळा खावा. 

धणे शरीरासाठी उपयुक्त आहेत. धणे खाल्याने शरीरातील उष्णता कमी हाेते. थायराॅईडचा त्रास कमी हाेताे. 

आहारात मेथीचा समावेश केला, तर इन्सुलिन प्रमाणात राहण्यास मदत हाेते. इन्सुलिन प्रमाणात राहिल्यास डायबिटीसचा धाेका कमी हाेताे. 

नाचणीमध्ये लाेह तत्त्व असते. आहारात नाचणीचा समावेश केल्यास रक्त वाढीस मदत हाेते. त्याचबराेबर नाचणी थंड आणि शक्तीवर्धक असते. 

शतावरी हे महिलांसाठी खूप उपयुक्त आहे. शरीरात हाेणाऱ्या हार्माेनल चेंजना संतुलित करण्याचे काम शतावरी करते. 

डाळिंब खाल्याने रक्तवाढ हाेते. त्यामुळे शरीरातील शक्ती वाढते. फ्रेश राहू शकता. म्हणून महिलांनी हे सुपर फूड घ्या. 

Click Here