हिवाळ्यात रोज १ गुळाचा खडा खाण्याचे फायदे अनेक... 

हिवाळा सुरू झाला की आहारात ऊब देणाऱ्या आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या पदार्थांचा समावेश करणं अत्यंत गरजेचं असतं.

दररोज एक छोटा तुकडा गुळ खाल्ल्यास शरीराला उष्णता मिळते, पचन सुधारते आणि लहान - सहान आजारांपासून संरक्षण मिळतं.

थंडीत शरीराला उष्णता देण्यासाठी गुळ खाणे हा नैसर्गिक उपाय आहे. तो फक्त गोड नाही तर आरोग्यदायी देखील असतो. 

गुळामध्ये आयर्न, मॅग्नेशियम आणि झिंक भरपूर प्रमाणांत असते, जे शरीराची रोगप्रतिकारशक्ती अधिक मजबूत करतात.

दररोज थोडासा गुळ खाल्ल्याने ऐन थंडीच्या दिवसांत शरीरातील इन्स्टंट एनर्जी वाढवण्यास मदत मिळते. 

जेवणानंतर थोडासा गुळ खाल्ल्याने पचन एन्झाईम्स अ‍ॅक्टिव्ह  होतात आणि अन्नपदार्थांचे नीट पचन होण्यास मदत मिळते. 

गुळ रक्त शुद्ध करतो आणि त्वचेला नैसर्गिक चमक देतो.

गुळात नैसर्गिक अँटिऑक्सिडंट्स असतात, जे हिवाळ्यात होणाऱ्या सर्दी-खोकल्यापासून बचाव करतात.

गुळ हा लोहाचा उत्तम स्रोत आहे. हिवाळ्यात गूळ खाल्ल्याने शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी सुधारते आणि ॲनिमिया सारख्या समस्यांपासून बचाव होतो.


गुळामध्ये नैसर्गिकरित्या उष्णता निर्माण करणारे गुणधर्म असतात. थंडीमध्ये रोज गुळ खाल्ल्याने रक्तप्रवाह सुधारतो आणि शरीराचे तापमान नियंत्रित राहते.

Click Here