पपईमध्ये व्हिटॅमिन ए, सी, ई आणि भरपूर प्रमाणात फायबर असते.
पपईमध्ये पपेन नावाचे पाचक एन्झाईम असते, जे प्रथिने पचवण्यास मदत करते.
गॅस, अपचन किंवा बद्धकोष्ठतेचा त्रास आहे, त्यांच्यासाठी पपई खाणे अत्यंत फायदेशीर ठरते.
रोज पपई खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते, यामुळे वारंवार होणारे आजार आणि संसर्गाचा धोका कमी होतो.
वजन कमी करायचे असेल, तर पपई खा. यामुळे पोट भरलेले राहते आणि भूकही लागत नाही.
पपईमध्ये फायबर, पोटॅशियम आणि जीवनसत्त्वे असतात जी हृदयाच्या रक्तवाहिन्यांचे आरोग्य राखतात.
पपईमध्ये व्हिटॅमिन ए असते. यात असणारे जीवनसत्व डोळ्यांची दृष्टी सुधारण्यास आणि वाढत्या वयानुसार होणाऱ्या डोळ्यांच्या समस्या रोखण्यास मदत करते.
पपईमध्ये व्हिटॅमिन 'के' असते, जे हाडांच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे. यामुळे शरीरातील कॅल्शियम शोषण्याची क्षमता वाढते आणि हाडे मजबूत होतात.