लाल रंगाचे, आंबट-गोड चवीचे क्रेनबेरी हे फळ दिसायला जेवढे आकर्षक असते, तेवढेच ते आरोग्यासाठीही फायदेशीर आहे.
अँटिऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन 'सी' आणि फायबरने समृद्ध असलेले क्रेनबेरी फळ हृदयाचे आरोग्य व पचन सुधारते आणि शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते.
क्रेनबेरीचे फळ मूत्रमार्गाच्या संसर्गावर (UTI) नियंत्रण ठेवण्यास मदत करते.
क्रेनबेरीमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स, विशेषतः फ्लेव्होनॉइड्स, रक्तवाहिन्या लवचिक ठेवतात आणि रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करतात.
व्हिटॅमिन 'सी' आणि अँटिऑक्सिडंट्स त्वचेची चमक नैसर्गिकरीत्या वाढवतात.
क्रेनबेरीमधील व्हिटॅमिन 'सी' पांढऱ्या रक्तपेशींना अॅक्टिव्ह करते, ज्यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते.
क्रेनबेरी फायबरयुक्त असल्यामुळे पचनक्रिया चांगली राहते आणि बद्धकोष्ठतेपासून बचाव होतो.
क्रेनबेरीमध्ये असलेले फायबर पचनक्रिया सुरळीत ठेवते.