मोह मोह के धागे! उबदार कपड्यांसोबत घाला क्रोशाचे कानातले..

विंटर फॅशनसाठी वेगवेगळ्या फॅशनचे क्रोशा कानातले देतील तुम्हाला खास विंटर स्पेशल कोझी लूक...

हिवाळयात वूलन स्वेटर्स, जॅकेट्स, शॉल्स आपल्या लूकला एक वेगळीच कोझी स्टाईल देतात, आणि त्याला मॅच होईल असे क्रोशाचे कानातले हे परफेक्ट ऑप्शन ठरतात. 


विंटर वेअरवर हलके, स्टायलिश आणि हँडमेड अ‍ॅक्सेसरीज म्हणून क्रोशाचे कानातले खूपच सुंदर दिसतात. 

सौम्य, उबदार टेक्स्चर आणि नाजूक डिझाईन्समुळे ते विंटर आउटफिटला एकदम ट्रेंडी टच देतात.

रंगीत यार्न, फुलांचे पॅटर्न, झिरो-वेट हलके डिझाईन्स हे क्रोशा ईयररिंग्स हिवाळ्यातील फॅशनला एक अनोखा लूक देतात. 

स्वेटर्स, हायनेक किंवा शॉल्ससोबत जबरदस्त दिसणारे क्रोशा चे कानातले क्लासिक दिसतात. 

सुंदर मोती किंवा बीड्स लावल्यास कानातल्यांना एलिगंट लुक मिळतो. विंटर पार्टीसाठी बेस्ट.

जेव्हा तुम्ही मोठा मफलर किंवा हाय नेक स्वेटर घालता, तेव्हा लांब लटकणारे डँग्लर क्रोशा कानातले छान दिसतात. 

कानातल्यांचे गडद मॅरून, फॉरेस्ट ग्रीन, मस्टर्ड यलो किंवा क्लासिक ग्रे, क्रीम कलर निवडा ते सगळ्या रंगांच्या विंटर वेअरवर उठून दिसतात.

हलक्या रंगातील हे नाजूक डिझाईन फॉर्मल किंवा सोफिस्टिकेटेड विंटर वेअरसाठी परफेक्ट आहे.

क्रोशा कानातले तुमच्या जाड स्वेटरच्या टेक्सचरशी उत्तम जुळतात त्यामुळे ते विंटर वेअर कपड्यांसोबत परफेक्ट मॅच करता येतात.

Click Here