भाजल्यावर 'हा' उपाय करा फाेड येणारच नाही 

किचनमध्ये काम कधी तरी गरम तव्याचा हात लागताे, हातावर गरम तेल उडते. जळजळ हाेते, फाेड आल्यावर खूप त्रास हाेताे. 

गरम तेल उडलं, भाजलं तर हे उपाय केल्यावर तुम्हाला फाेड येणार नाही. हे घरगुती उपाय तुम्हाला माहिती आहेत का?

नेहमी कणिक (गव्हाचे पीठ) एका पिशवीत भरून फ्रिजमध्ये ठेवा. ही कणिक भाजल्यावर लावली तर काेणताही त्रास हाेत नाही. 

फ्रिजमध्ये कणिक ठेवायला विसरला असाल, तर नुसती कणिक लावली, तरी जळजळ हाेणार नाही आणि फाेडही येणार नाही. 

भाजल्यावर लगेच थंड पाण्याच्या भाजलेला भाग धरा. १० मिनिटं पाणी पडल्याने उष्णता कमी हाेते, त्याचा त्वचेवर खाेलवर परिणाम हाेताे. 

काेरफडीचा गर भाजलेल्या ठिकाणी लावा. गरामुळे सूज कमी हाेते. नॅचरल थंडाव्यामुळे त्वचा थंड हाेते. 

हळद आणि तूप एकत्र करून भाजलेल्या ठिकाणी लावा. हळदीमुळे जंतूसंसर्ग हाेत नाही, तसेच तुपामुळे त्वचा मऊ हाेते. 

भाजलेल्या ठिकाणी थाेडं थाेडं दूध ठेवा. दुधामुळे त्वचेची जळजळ कमी हाेते. 

टाॅमेटाेचा गर किंवा रस भाजलेल्या ठिकाणी लावा. यामुळे त्वचेची सूज कमी हाेण्यास मदत हाेते. 

ज्या ठिकाणी भाजले आहे, त्याठिकाणी थेट बर्फ लावू नका, त्यामुळे त्वचेला इजा हाेऊ शकते. 

भाजले असेल तिथे अन्य काेणतीही गाेष्ट लावू नका. खूप खाज आली तरी खाजवू नका. 

भाजल्यावर त्या भागाला सूज आली, फाेड आले. तर, त्वरित डाॅक्टरकडे जा. याेग्य औषधाेपचाराची गरज यावेळी अधिक असते. 

Click Here