आता मिरचीने हात नाही चुरचूरणार

पदार्थाची चव वाढण्यासाठी, काही वेळा झणझणीतपणासाठी मिरच्यांचा वापर सर्रास केला जाताे. पण, मिरच्या वापरताना हाेणारा त्रास नकाेसा वाटताे. 

राेजच्या जेवणात वापरल्या जाणाऱ्या हिरव्या मिरच्या कापल्यावर हातांना जळजळ हाेते, ताेच हात डाेळ्याला, ताेंडाला लागला तरी त्रास हाेताे.

मिरच्या जेवणाची चव तर वाढवतात पण, मिरच्यांच्या तिखटपणा मुळे हाेणारा त्रास आता सहन करायची गरज नाही. 

मिरच्यांमुळे हाेणारा त्रास हाेऊ नये यासाठी काही खास घरगुती उपाय आहेत. हे उपाय घरगुती केले तर तुम्हाला त्रास हाेणार नाही. 

मिरच्या तिखट असल्याने कापल्यावर हातांची जळजळ हाेते, ही जळजळ हाेऊ नये म्हणून हाताला गाेड तेल लावू शकता.

मिरच्या कापताना तुम्हाला जास्त त्रास हाेत असेल तर हातात ग्लाेज घालू शकता. यामुळे मिरच्यांचा हाताला थेट स्पर्श हाेणार नाही, त्रासही हाेणार नाही.

मिरच्या कापण्यासाठी तुम्ही कात्रीचा वापर करू शकता. यामुळे मिरचीचा हाताशी संपर्क आला नाही, तर तुमच्या हाताची जळजळ हाेणार नाही. 

मिरच्या कापून झाल्यावर थंड पाण्या खाली हात धुवा किंवा थंड पाण्यात हात घालून ठेवा. यामुळे हातांची हाेणारी जळजळ कमी हाेईल. 

मिरच्या काण्याआधी तुम्ही हाताला तूप लावू शकता. तूप लावल्याने हातावर एक थर निर्माण हाेताे. त्यामुळे मिरच्यांमुळे हाताची जळजळ हाेत नाही. 

Click Here