गणपतीत भेटवस्तू म्हणून देता येतील अशा खास गिफ्ट्स आयडिया...

गणपतीत काही हटके आणि उपयुक्त भेटवस्तू म्हणून काय देता येईल, याचे खास पर्याय पाहूयात.. 

गणपती बाप्पाच्या आगमनाने घराघरात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण असते.

या सणावाराला नातेवाईक आणि मित्र-मैत्रिणींच्या घरी जाऊन बाप्पाचे दर्शन घेतले जाते. अशावेळी रिकाम्या हाताने जाणे योग्य वाटत नाही.

यासाठीच, गणपतीत काही हटके आणि उपयुक्त भेटवस्तू म्हणून काय देता येईल, याचे खास पर्याय पाहूयात.. 

आपण एखादी इको-फ्रेंडली शाडूच्या मातीची छोटीशी गणपती बाप्पांची मूर्ती भेटवस्तू म्हणून देऊ शकतो. 

वेगवेगळ्या प्रकारचे मोदक एकत्रित करून आपण एखादा कस्टमाईज मोदक बॉक्स भेटवस्तू म्हणून देऊ शकतो. 

आरती व पूजेचे सामान हा देखील गिफ्ट म्हणून देण्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. गणपतीची पूजाअर्चा करताना याचा वापर होऊ शकतो. 

हँडमेड दिवे, शोपीस किंवा घर सजावटीसाठी वेगवेगळ्या डेकोरेटिव्ह वस्तू किंवा आर्टिफॅक्ट्स भेटवस्तू म्हणून देण्यासाठी बेस्ट आहेत. 

गणपती बाप्पाची वेगवेगळी रुपं आणि श्लोक लिहिलेले कस्टमाईज टी - शर्ट गिफ्ट म्हणून देण्यासाठी फारच छान आहेत. गणपतीच्या नावाने छापलेले मग्स, की-चेन किंवा फोटो फ्रेम्स हे देखील उत्तम पर्याय आहेत. 

विविध प्रकारचा सुकामेवा एका सुंदर बास्केटमध्ये गिफ्ट पॅक करून देऊ शकता.

मातीच्या किंवा आकर्षक डिझाइनच्या पणत्या किंवा सुगंधित मेणबत्त्यांच्या सेट खूप सुंदर दिसतो आणि उपयुक्तही असतो.

Click Here