पोटातील गॅसची समस्या अनेकदा आपण किरकोळ मानून दुर्लक्षित करतो, पण ती शरीरातील मोठ्या बदलांचे संकेत असू शकते.
सकाळची सुरुवात फ्रेश आणि उत्साहवर्धक व्हायला हवी. परंतु, अनेकांना सकाळी उठताच पोट जड होणे, गॅस होणे किंवा पोट फुगल्यासारखे वाटणे अशा समस्यां सतावतात.
रात्री उशिरा जेवण, जड आहार किंवा कमी हालचाल यामुळे पचनशक्ती मंदावते आणि सकाळी गॅस होतो, हे कमकुवत पचनशक्तीचे लक्षण आहे.
सकाळी शौचास व्यवस्थित न होणे हे गॅसचे प्रमुख कारण असू शकते, यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या वारंवार त्रास देऊ शकते.
पोटातील अॅसिडिटी वाढल्यास सकाळी उठल्या - उठल्या जळजळ, ढेकर येणे आणि गॅस होऊन पोट फुगणे अशा समस्या सतावतात.
जर तुमचं लिव्हर अन्नाचं नीट पचन करू शकत नसेल, तर सकाळी उठल्यावर पोट फुगल्यासारखं वाटतं. हे फॅटी लिव्हरचे संकेत असू शकतात.
जर तुम्हाला गॅससोबतच सकाळी वारंवार शौचालयाला जावे लागत असेल, तर हे इरिटेबल बाऊल सिंड्रोम (IBS) चे लक्षण असू शकते. यात आतड्यांची संवेदनशीलता वाढते.
रात्रीचे उशिरा जेवण झोपण्यापूर्वी २ ते ३ तास आधी न जेवल्यास अन्नाचे नीट पचन होत नाही. हे अन्न पोटात कुजते आणि सकाळी गॅसच्या रूपात त्रास देते.
मानसिक तणावाचा थेट परिणाम पचनावर होतो, त्यामुळे सकाळी गॅस जाणवू शकतो.
सकाळी कोमट पाणी, योग्य आहार, वेळेवर झोप आणि नियमित व्यायाम उपयुक्त ठरतो.