हाताचा लसूणाचा वास घालवण्यासाठी टिप्स

स्वयंपाक घरातला पदार्थाची चव वाढवणारा महत्त्वाचा घटक म्हणजे लसूण. पदार्थाची चव वाढवत पण हाताला येणारा वासही अधिक काळ टिकताे. 

भाजी, आमटी अन्य पदार्थांना एक तडका हवा असेल, तर लसूण हा उत्तम पर्याय आहे. अनेक गृहिणी लसणाचा सढळ हाताने वापर करतात.

लसूण आराेग्यासही गुणकारी मानला जाताे. पण, हे लसूण वापरल्यावर हाताला येणारा वास मात्र अनेकवेळा नकाेसा वाटताे. 

लसूण कापल्यावर त्यातलं Allicin नावाचं सल्फर कंपाउंड बाहेर पडतं. यामुळेच लसणातून एक प्रकारचा तीव्र वास येताे. 

लसणातील हे सल्फर कंपाउंड्स खूप सूक्ष्म असतात आणि आपल्या त्वचेच्या नैसर्गिक तेलात मिसळून बसतात. त्यामुळे वास पटकन जात नाही.

लसणातील हे कंपाउंड्स हळूहळू हवेत मिसळतात आणि त्वचेतून बाहेर येतात. त्यामुळे साबणाने धुतलं तरी लगेच फरक पडत नाही.

लसणाचा वास घालवण्यासाठी स्टेनलेस स्टीलच्या चमच्याला किंवा सिंकला हात चोळा. धातू सल्फर कंपाउंड्सशी प्रतिक्रिया हाेऊन वास कमी करतो.

लिंबातलं सिट्रिक ऍसिड त्वचेतला वास कमी करतं. हातावर लिंबाचा रस लावा आणि त्यानंतर हात धुवून टाका. वास पटकन कमी हाेताे. 

लसणाचा वापर केल्यानंतर हात कॉफी पावडर किंवा बेकिंग सोड्याने चोळून धुतले, तर वास पटकन नाहीसा होतो.

लसूण वापरल्यानंतर खूप वास येत असेल तर, हात पुदिन्याच्या किंवा कोथिंबिरीच्या पानांनी चोळा. नैसर्गिक सुगंधामुळे लसणाचा वास कमी हाेताे.

Click Here