त्वचा नेहमी चांगली, तजेलदार राहण्यासाठी स्वयंपाकघरात वापरला जाणारा मध हा खूपच गुणकारी आहे.
त्वचा काेरडी पडणे, पिंपल्स अशा गाेष्टींचा त्रास हाेत असेल तर घरगुती उपाय खूप फायद्याचा आहे. घरीच तुम्ही स्कीन छान हाेऊ शकते.
त्वचा चांगली राहण्यासाठी मुलतानी माती वापरतात. पण, मुलतानी मातीमध्ये मध घातल्यास त्वचेला ग्लाे येताे.
मुलतानी माती ही चेहऱ्यासाठी खूप चांगली असते. पण, त्वचा काेरडी पडू शकते, यामध्ये मध घातल्यास त्याचा फायदा हाेताे.
चेहऱ्यावर पिंपल्स येत असतील, तर मुलताना मातीमध्ये मध घालून चेहऱ्याला लेप लावावा. पिंपल्स कमी हाेण्यास, त्याचे डाग जाण्यास मदत हाेते.
चेहरा तेलकट हाेत असेल, त्वचा जास्त तेलकट असेल, तर त्यासाठी मध उपयुक्त आहे. मधामुळे चेहऱ्याचा तेलकटपणा कमी हाेण्यास मदत हाेते.
चेहऱ्यावर डाग असतील, त्वचा जास्त टॅन झाली असेल, तरी मधाचा उपयाेग हाेऊ शकताे. मसुर डाळीच्या पिठात मध घालूनही वापरू शकता.
डाळीच पिठ, मध आणि गुलाब पाणी एकत्र करून लावल्यास त्वचेला चांगला ग्लाे येऊ शकताे. यामुळे त्वचेला पाेषण मिळते.