वारंवार होणाऱ्या गॅसच्या त्रासामुळे पोट फुगणे, आंबट ढेकर येणे आणि पोटात दुखणे अशा समस्या त्रास देतात.
पोटात गॅस होणे ही एक कॉमन पण त्रासदायक समस्या आहे.
चुकीचा आहार, अति खाणे किंवा काही विशिष्ट पदार्थ खाल्ल्यामुळे ही समस्या अधिक वाढू शकते.
गॅस होऊ नये म्हणून कोणते पदार्थ खाणे टाळावेत, ते पाहूयात...
जास्त तेलकट - तूपकट पदार्थ खाल्ल्याने गॅस वाढतो. शक्यतो तळलेले - मसालेदार पदार्थ खाणे टाळावे.
वांग आणि वांग्याचे पदार्थ खाल्ल्याने देखील गॅस होतो. ज्यांना गॅसचा त्रास असेल त्यांनी वांग खाऊ नये.
बिस्कीट, ब्रेड, पराठा यांसारखे मैद्यापासून तयार केलेले पदार्थ गॅसचा त्रास असणाऱ्यांनी कधीच खाऊ नयेत.
कोबी, फ्लॉवर किंवा ब्रोकोली खाल्ल्याने देखील गॅसची समस्या अधिक वाढू शकते.
ज्यांना गॅसच्या समस्येचा त्रास आहे त्यांनी दूध व दुधाचे पदार्थ अजिबात खाऊच नयेत.
चणे, राजमा, छोले यांसारखी कडधान्य पचायला फार जड असतात, त्यामुळे पोटात गॅस होऊ शकतो.
केक, पेस्ट्री, कुकीज यांसारखे बेक्ड पदार्थ भरपूर प्रमाणात खाल्ल्याने देखील पोटांत गॅस होण्याची समस्या सतावते.