वेळीच व्हा सावध! आजाराकडे दुर्लक्ष करणं ठरेल जीवघेणं
व्हायरल इन्फेक्शन हे कोणत्याही व्हायरसपासून होऊ शकतं. सध्या त्याची साथ पाहायला मिळत आहे.
गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा, बाहेर जाताना शक्यतो मास्कचा वापर करा.
व्हायरलपासून वाचण्यासाठी हात स्वच्छ धुवा. आजारी लोकांपासून लांब राहा.
सकस आहार आणि पुरेशी झोप घेणं हे अत्यंत आवश्यक आहे.
शिंकताना किंवा खोकताना रुमाल किंवा टिश्यूचा वापर करा.
फळं खा. फळांमध्ये व्हिटॅमिन्स आणि अनेक पोषक तत्व असतात.
शरीर हायड्रेटेड ठेवण्यासाठी योग्य प्रमाणात पाणी प्या.