राेजची कामं आणि त्यातच घराची स्वच्छता यात तारांबळ उडते आहे. पण, आता टेन्शन घेऊ नका, या टिप्समुळे १५ मिनिटांत तुम्ही घर स्वच्छ आवरू शकता.
घराची स्वच्छता करायला राेजच्या कामातून वेळ मिळत नाही? तुम्हाला द्यायची आहेत राेज फक्त १५ ते २० मिनिटं.
प्रत्येकाचा राेजचा एक दिनक्रम ठरलेला असताे. काेणत्या वेळी काय करायचे हे टाईमटेबल ठरलेले असते.
या टाईमटेबलमध्ये आता राेज तुम्हाला १५ ते २० मिनिटांचा वेळ राखीव ठेवायचा आहे ताे स्वच्छतेसाठी.
आता इतक्या कमी वेळात अख्खं घर कसं स्वच्छ हाेणार? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल, पण आपण फक्त एक काेपरा निवडायचा आहे.
घरातला एक काेपरा म्हणजे एक जागा तुम्ही स्वतः ठरवायची आणि त्या वेळेत तिथल्या भागाची स्वच्छता करायची.
कपाटाचा एखादा कप्पा, शाेकेस, डायनिंग टेबल, ओटा असं एक एक ठिकाण ठरवून स्वच्छ करा.
एका आठवड्यात घरातली सात ठिकाणं स्वच्छ झालेली असतील. सुटीच्या दिवशी एकाच वेळी सगळी साफसफाई करताना दिवस निघून जाताे.
पण, राेजच्या राेज अशी स्वच्छता केल्याने तुम्हाला कंटाळा येणार नाही आणि तुमच घर पण नेहमीच लख्ख राहिल.