एक तरी मैत्रीण असावी, कारण...

संशोधनानुसार, चांगल्या मैत्रिणी असलेल्या महिलांना नैराश्य व तणाव कमी जाणवतो. त्यांचं मन अधिक शांत आणि सकारात्मक राहतं.

घर, ऑफिस, जबाबदाऱ्या, नाती, सण - समारंभ अशी तारेवरची कसरत ती नेहमीच करत असते. या सगळ्यात तिच्या जिव्हाळ्याचा एक काेपरा असताे. 

अनेकदा तिला जवळची वाटणारी ती म्हणजे तिची खास मैत्रिण. पण, राेजच्या धबाडग्यात तिला स्वतःसाठी मैत्रिणीसाठी वेळच मिळत नाही. 

राेजच्या रूटीनमध्ये ती पूर्णतः अडकलेली असली तरी तिला तिचा एकांत हवा असताे. तेव्हा एक फोन, एक चहा मैत्रिणीसोबत मन आनंदित करतो.

महिलांच्या आयुष्यातील मैत्रिणी फक्त सहकारी नाहीत किंवा फक्त एक नातं नसतं. तर त्या तिचा मानसिक आधार असतात. 

मैत्रिणींच्या भेटीतून, त्यांच्याशी बाेलल्यावर तिला समाधान, आत्मविश्वास आणि मानसिक स्वास्थ्य लाभतं.

मैत्रिणींशी मन मोकळं करता येतं. दुःख, चिंता, ताण हे शेअर केल्याने भावनिक ओझं हलकं होतं. इथे तिला काेणीही जज करत नाही. 

मोकळेपणा, हसणं-खिदळणं यामुळे रक्तदाब, झोप, हार्मोन्स यावर सकारात्मक परिणाम होतो. मैत्री म्हणजे नैसर्गिक औषधच असंत जणू तिचं. 

मैत्रिणी एकमेकींची ताकद वाढवतात. त्यांच्या सल्ल्यामुळे आणि पाठिंब्यामुळे महिलांमध्ये आत्मभान आणि निर्णयक्षमता निर्माण होते.

मैत्रिणीमुळे सामाजिक सहभाग वाढतो. एकमेकींच्या कुटुंबात, उपक्रमांमध्ये सामील होऊन समाजाशी अधिक जोडता येतं.

मैत्रिणी प्रेरणा देतात. त्यांनी केलेल्या वाटचालीतून शिकायला मिळतं. वैयक्तिक व व्यावसायिक प्रगतीस चालना मिळते.

Click Here