भांड्याना ही असते एक्सपायरी डेट

खाण्याच्या पदार्थांची एक्सपायरी डेट नेहमी चेक करता. पण, तुम्हाला माहितीये का? राेज ज्या भांड्यामध्ये अन्न शिजवता त्यालाही एक्सपायरी डेट असते. 

राेजच्या राेज स्वयंपाकघरात वापरल्या जाणारी भांडी किती दिवस, वर्ष वापरावी, याचे काही नियम असतात. भांड्यांची एक्सपायरी डेट पाहू या.

Non Stick भांड्यावरचे काेटिंगवर स्क्रॅचेस दिसायला लागले, की ते वापरण्या याेग्य राहात नाही. २ ते ३ वर्षांत या भांड्यावरचे काेटिंग खराब हाेते. 

स्टीलची भांडी ५ ते ६ वर्ष वापरू शकताे. जास्त वेळा गरम हाेऊन नंतर त्यांच्यावर गंज दिसू लागताे. त्यावर क्रॅक्स येतात. 

लाेखंडी भांडी वापरताना काळजी घेतली पाहिजे. seasoning वेळच्या वेळी केल्यास १० वर्षेही टिकतात. सतत गंज लागत असेल तर भांडी वापरणे टाळा. 

प्लॅस्टिकचे डबे, बाटल्या या १ ते २ वर्षांपेक्षा जास्त वापरू नयेत. प्लॅस्टिकला बारीक क्रॅक्स जातात. त्यामुळे या वस्तू वापरणे घातक असते. 

काचेची भांडी ही तुटत नाहीत, ताेपर्यंत वापरू शकताे, असा समज आहे. भांडी घासल्याने त्या भांड्यावरचा चमकदार थर गेल्यावर भांडी वापरणे धाेकादायक आहे. 

चाॅपिंग बाेर्ड हा जास्तीत जास्त १ ते २ वर्ष वापरावा. यावर खाेलवर ओरखडे आल्याने ताे खराब हाेताे, त्यात घाण अडकते. 

स्क्रबर किंवा स्पंज. भांडी घासण्यासाठी सर्वाधिक वापरला जाणारा स्क्रबर २ ते ३ आठवड्यात बदलला पाहिजे. जास्त काळ वापरणे धाेकादायक असते. 

Click Here