मुलगी आहे म्हणून काही गाेष्टी गृहित धरल्या जातात. पण, आता मुलींना लहानपणापासूनच कणखर बनवलं पाहिजे. मुलींना 'असं' बनवा कणखर.
आजही अनेकदा ती मुलगी आहेस, म्हणून काही गाेष्टींची बंधने मुलींवर येतात. पण, त्याचबराेबर तू एक माणूस आहेस, असा आत्मविश्वास मुलींना दिला पाहिजे.
तू जशी आहेस तशी सुंदर आहेस. तुला बाकीचे कसे पाहतात, काय म्हणतात यावर तुझं साैंदर्य अवलंबून नाही.
नाही म्हणायची ताकद तुझ्यात आहे, तुझ्या सीमांचे रक्षण तूच करू शकतेस. दुसरं काेणतरी मदतीला येईल याची वाट पाहू नकाेस.
आयुष्यात निर्णय चुकला, अपयश आलं तर खचून जाऊ नकाेस. त्यातून शिकं, अपयश म्हणजे शेवट नाही, यशाकडे जाणारा एक टप्पा आहे.
कधीच काेणावर अवलंबून राहू नकाेस. आर्थिक स्वावलंबन मिळवं, मानसिक स्थिती छान ठेवं. तू स्वावलंबी हाे.
फसव्या साैंदर्यांच्या कल्पनांवर विश्वास ठेवू नकाेस. साेशल मिडीया हे वास्तव नसून आभासी जग आहे. वास्तवात जगायला शिकवा.
काेणही तुझं मतं दडपून टाकेल अशी राहू नकाेस. स्वतःचं मतं ठामपणे मांडायला शिक. स्वतः विचार कर.
आई - बाबा दाेघेही तुझ्या पाठीशी कायम उभे आहेत. स्वतःला कधीच एकटी समजू नकाेस. काेणत्याही परिस्थितीत खचून जाऊ नकाेस.