घरातील ७ वस्तू आहेत टॉयलेटपेक्षाही जास्त घाणेरड्या...
घरात अशा अनेक वस्तू असतात, ज्यांचा आपण रोज वापर करतो, पण त्या बाथरूमपेक्षाही जास्त अस्वच्छ आणि रोगजंतूंनी भरलेल्या असतात.
आपण सर्वसाधारणपणे बाथरूमला घरातील सर्वात जास्त घाण आणि हानिकारक जंतूंचं ठिकाण मानतो.
परंतु खरं सांगायचं तर घरात अशा काही वस्तू असतात ज्या बाथरूमपेक्षाही अधिक घाणेरड्या असतात.
घरात अशा अनेक वस्तू असतात, ज्यांचा आपण रोज वापर करतो, पण त्या बाथरूमपेक्षाही जास्त अस्वच्छ आणि रोगजंतूंनी भरलेल्या असतात.
टीव्ही, एसी आणि इतर उपकरणांचे रिमोट अनेक लोक हाताळतात, पण ते कधीच स्वच्छ केले जात नाहीत. रिमोटवरील बटणांमध्ये आणि खाचांमध्ये जंतू जमा होऊन ते अधिक जास्त घाण होतात.
घरातील दाराच्या हँडल्सना अनेकजण स्पर्श करतात. यामुळे त्यावर बॅक्टेरिया आणि जंतू जमा होतात. हे रोज स्वच्छ करणे आवश्यक असते.
घरातील लाईट्सच्या स्विचेसना अनेकजण स्पर्श करतात. यामुळे त्यावर घाण व जंतू जमा होतात. यामुळे हे स्विचेसना लगेच खराब होतात.
आजकाल मोबाईल फोन आपण बाथरूममध्येही घेऊन जातो. यामुळे मोबाईलवर अनेक जंतू जमा होतात. संशोधनानुसार, मोबाईलवर टॉयलेट सीटपेक्षा जास्त जंतू असतात.
किचन स्पंज आणि डिशवॉश स्क्रबर यामध्ये अन्नकण व ओलसरपणा साठल्याने सर्वाधिक जंतू यात वाढतात.
चाकू व सुऱ्याच्या हॅंडलवर जमलेल्या काळ्या थरांमध्ये भरपूर प्रमाणात हानिकारक असे बॅक्टेरिया लपलेले असतात.
लाकडी कटिंग बोर्डवरील ओलसरपणा व सततच्या वापराने त्यावर बॅक्टेरिया साचतात.