मुलतानी माती चेहऱ्याला लावण्याची योग्य पद्धत पहा, नाहीतर फायद्याऐवजी होईल नुकसान...
मुलतानी माती त्वचेसाठी वरदान मानली जाते, पण ती लावताना काही चुका केल्यास त्वचेचे नुकसान होऊ शकते.
मुलतानी माती फक्त पाण्यात मिसळून चेहऱ्यावर लावू नका. गुलाबपाणी, दही किंवा दूध वापरा हे त्वचेला पोषण देतात आणि कोरडेपणा कमी करतात.
फेसपॅक ८ ते १५ मिनिटांपर्यंत किंवा तो ७० ते ८०% सुकल्यावर लगेच धुऊन टाका. तो पूर्णपणे कडक होऊ देऊ नका.
मुलतानी माती नैसर्गिक असली तरी दररोज वापरल्यास त्वचा कोरडी पडते, आठवड्यातून १ ते २ वेळा वापरणे पुरेसे आहे.
फेसपॅक काढल्यानंतर चेहऱ्याला मॉइश्चरायझर किंवा एलोवेरा जेल लावा, यामुळे त्वचा मऊ, हायड्रेटेड आणि चमकदार राहील.
मुलतानी माती लावल्यानंतर लगेच बाहेर उन्हात जाऊ नका, यामुळे सूर्यप्रकाशाने टॅनिंग किंवा रॅश येऊ शकतात.
फेस पॅक काढण्यापूर्वी चेहऱ्यावर थंड किंवा कोमट पाणी शिंपडून तो ओला करा. त्यानंतर हलक्या हाताने गोलाकार मसाज करत तो हळूवारपणे धुऊन टाका.
पहिल्यांदाच वापरत असाल तर पॅच टेस्ट करा. हातावर थोडी माती लावून १० मिनिटं ठेवा, लालसरपणा - खाज आली तर चेहऱ्यावर लावू नका.