न्यूट्रिशनिस्टने काय सांगितलं ते एकदा वाचाच, आरोग्याला होईल फायदा
थंड पाणी प्यायल्याने तहान लगेच भागते आणि एकदम फ्रेश वाटतं.
न्यूट्रिशनिस्ट अमिता गद्रे यांनी थंड पाणी प्यायल्याने वजन वाढतं का याबाबत माहिती दिली.
पाण्यात अजिबात कॅलरीज नसतात, म्हणून वजनावर कोणताही परिणाम होत नाही.
दररोज फक्त योग्य प्रमाणात पाणी पिण्याची आवश्यकता आहे.
जर तुम्ही कमी पाणी प्यायलात तर थकवा जाणवतो. रोज ६-८ ग्लास पाणी प्या.
अजिबात काळजी न करता थंड पाणी पिऊ शकता, कारण यामुळे तुमचं वजन वाढत नाही.