फक्त ७ दिवस चेहऱ्याला लावा शहाळ्याचे पाणी, त्वचा दिसेल सुंदर... 

त्वचा निरोगी, चमकदार आणि हायड्रेट ठेवण्यासाठी शहाळाच्या पाण्याचे फायदे काय आहेत ते पाहा... 


शहाळ्याचे पाणी फक्त पिण्यासाठीच नाही, तर त्वचेसाठीही अमृतासारखेच मानले जाते. 

शहाळाचे पाणी अँटीऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन्स आणि मिनरल्सयुक्त असते, जे त्वचेला आतून पोषण देते. 

शहाळ्याचे पाणी चेहरा धुतल्यानंतर चेहऱ्यावर स्प्रे करा. हे नैसर्गिक टोनर म्हणून काम करते आणि 'पोर्स' घट्ट करण्यास मदत करते.

 शहाळ्याच्या पाण्यात कापसाचा बोळा भिजवून पिंपल्सवर लावा, यातील अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म पिंपल्स कमी करण्यास मदत करतात.

उन्हामुळे त्वचा काळवंडली असेल किंवा जळजळ होत असेल, तर शहाळ्याचे पाणी लावा. हे त्वचेला थंडावा देते आणि 'टॅनिंग' लवकर दूर करते.

शहाळ्याच्या पाण्यात 'सायटोकिनिन' असते, जे वाढत्या वयाची लक्षणे, सुरकुत्या कमी करण्यास मदत करते. यामुळे त्वचा तरुण आणि फ्रेश दिसते.

मुलतानी माती किंवा बेसनमध्ये शहाळ्याचे पाणी मिसळून फेस पॅक तयार करा. हा पॅक लावल्याने ड्राय स्किनची समस्या दूर होऊन चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो येतो.

Click Here