दसऱ्याला साेने चांदी खरेदीचे फायदे 

सण, उत्सवात साेने -चांदी खरेदी केली जाते. दसर्‍याला सोने लुटण्याबरोबरच खरेदी केल्याने खरोखरच लाभ होतो का? वाचा

नवरात्रात नऊ दिवस देवीच्या वेगळ्या रूपाची पूजा केली जाते. प्रत्येक रूपात देवी एक वेगळा संदेश देत असते. 

देवीची उपासना करताना घरात सुख, शांती, समाधान, आराेग्य नांदावे अशी प्रार्थना केली जाते. 

नवरात्रामध्ये साेने - चांदीची खरेदी केल्यास घरात सुख, संपत्ती, समृद्धी येते असे मानले जाते. 

साेनं - चांदी म्हणजे शुद्ध रूप, उर्जा, दैवी उर्जा यांचे प्रतिक मानले जाते. हे प्रतिक घरात आणण्यास महत्त्व आहे. 

हिंदू संस्कृतीमध्ये साेनं म्हणजे धन याचा संबंध लक्ष्मी मातेशी जाेडलेला आहे. समृद्धी, संपत्तीसाठी लक्ष्मीचे पूजन केले जाते.

चांदीचा संबंध हा चंद्र, शीतलतेशी जाेडलेला आहे. चांदीचा संबंध सरस्वती देवीशी असल्याचे मानले जाते. 

साेने - चांदी हे समृद्धीचे प्रतिक आहे, दसऱ्याला याची खरेदी केल्यास घरात समृद्धी येते, असे मानले जाते.

Click Here