खतरनाक भारी! बालकलाकार झाले कसे सुपरस्टार?

बालकलाकार म्हणून पडद्यावर झळकलेले हे चेहरे आज हिंदी चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार्स...

बॉलिवूडमधील काही कलाकार असे आहेत ज्यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात अगदी लहान वयातच केली. 

श्रीदेवी यांनी अभिनयाची सुरुवात केवळ वयाच्या ४ व्या वर्षी तमिळ चित्रपटातून केली होती. नंतर बॉलिवूडमध्येही त्यांनी अपार यश मिळवले.

 सुपरस्टार ऋतिक रोशन लहानपणीच कॅमेऱ्यासमोर झळकला होता. ‘आप के दीवाने’ आणि ‘भगवान दादा’ या चित्रपटांमध्ये त्यांनी बालकलाकार म्हणून भूमिका केल्या होत्या.

‘मासूम’ या चित्रपटातील उर्मिलाची भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. बालकलाकार म्हणून त्यांनी मन जिंकले आणि पुढे एका यशस्वी अभिनेत्री म्हणून नाव कमावले.

‘संघर्ष’ या चित्रपटात आलियाने अक्षय कुमारच्या बहिणीची भूमिका केली होती. नंतर ‘स्टुडंट ऑफ द ईयर चित्रपटाने' तिला सुपरस्टार बनवले.

 ‘यादों की बारात’ या चित्रपटात लहान आमिर खान झळकला होता. त्यानंतर ‘कयामत से कयामत तक’पासून त्यांनी बॉलिवूडमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली.

 ‘कुछ कुछ होता है’ मधील अंजली म्हणजेच सना सईद. पुढे तिने काही मालिकांमध्येही काम केले आणि मोठी अभिनेत्री म्हणूनही स्वतःला सिध्द केलं.

नीतू सिंग यांनी वयाच्या ८व्या वर्षी 'बेबी सोनिया' या नावाने अभिनयाला सुरुवात केली. ‘दो कलियाँ’ (१९६८) या चित्रपटात त्यांच्या डबल रोलने प्रेक्षकांची मने जिंकली. 

Click Here