सामान्य माणसांप्रमाणे काही सेलिब्रिटीही ज्योतिषशास्त्र, रत्न, ग्रहांचा आपल्यावर होणारा परिणाम यावर खूप विश्वास ठेवतात.
वेगवेगळी रत्नं अंगठी, ब्रेसलेट किंवा लॉकेटच्या माध्यमातून घालतात. असे कोणकोणते सेलिब्रिटी आहेत ते पाहूया..
सलमान खानच्या हातात असणारं निळ्या खड्याचं ब्रेसलेट तर सगळ्यांनाच माहिती आहे. ते तो कधीही हातातून काढत नाही.
अमिताभ बच्चन यांच्या हातातही नेहमी एक पांढरा खडा दिसतो. तो पुष्कराज असावा असं अनेकजण म्हणतात.
शिल्पा शेट्टीही तिच्या हातात पुष्कराज घालते असं म्हटलं जातं.
गोविंदाचाही ज्योतिषशास्त्रावर खूप विश्वास आहे, असं त्याच्या पत्नीने नुकतंच एका पॉडकास्टमध्ये सांगितलं आहे.
एकता कपूरचा जेवढा विश्वास ज्योतिषशास्त्रावर आहे, तेवढाच विश्वास अंकशास्त्रावरही आहे.
संजय दत्तही या सगळ्या गोष्टी मानतो आणि तो ही वेळेनुसार वेगवेगळी रत्नं घालत असतो.