बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्रींनी अभिनयासोबतच, व्यावसायिक जगातही आपला ठसा उमटवला आहे.
फॅशन, ब्यूटी प्रॉडक्ट्स, स्किनकेअर अशा विविध क्षेत्रांत त्यांनी स्वतःचे ब्रँड्स (Brands) सुरू केले आहेत, जे प्रचंड यशस्वी ठरले आहेत.
बॉलिवूडमधील अशा काही अभिनेत्री आणि त्यांच्या दमदार ब्रँड्सबद्दल जाणून घेऊयात.
दीपिका पदुकोणने स्किनकेअर आणि वेलनेस क्षेत्रात '82°E' (एटीटू इ) या स्किनकेअर ब्रँडची सुरुवात केली आहे. त्वचेची काळजी घेणाऱ्या वेगवेगळ्या ब्यूटी प्रॉडक्ट्सवर हा ब्रँड भर देतो.
कतरिना कैफने स्वतःचा 'के ब्यूटी' (Kay Beauty) हा मेकअप ब्रँड लॉन्च केला आहे. 'मेड इन इंडिया' असलेला हा ब्रँड उच्च दर्जाची ब्यूटी प्रॉडक्ट्स परवडणाऱ्या दरात उपलब्ध करून देतो.
प्रियांका चोप्राने केसांच्या आरोग्यासाठी 'अनोमली हेअरकेअर' (Anomaly Haircare) हा ब्रँड सुरू केला आहे. केसांना पोषण देऊन त्यांना निरोगी ठेवण्यावर हा ब्रँड भर देतो.
अभिनेत्री अनुष्का शर्माने 'नश' (Nush) नावाचा स्वतःचा कपड्यांचा ब्रँड सुरू केला आहे.
अभिनेत्री कृती सेननने 'हायफन' (Hyphen) या स्किनकेअर ब्रँडची मालकीण आहे.
सोनाक्षी सिन्हाने सृष्टी रायसोबत 'सोएझी' (Soezi) हा ब्रँड २०२२ मध्ये लॉन्च केला. हा ब्रँड चांगल्या दर्जाच्या आणि पुन्हा वापरता येण्यायोग्य 'प्रेस-ऑन नेल्स'मध्ये खास ओळखला जातो.
आलिया भट्टने 'एड-अ-मम्मा' (Ed-a-Mamma) हा कपड्यांचा ब्रँड लॉन्च केला आहे, जो लहान मुलांचे कपडे, मॅटर्निटी वेअर आणि आता प्रौढांसाठीही कपडे तयार करतो.
सोनम व रिया कपूर बहिणींनी मिळून 'रेसन' हा फॅशन ब्रँड सुरू केला आहे, जो ट्रेंडी कपडे सहज उपलब्ध करून देतो.