हिवाळ्यात काळे तीळ आणि गूळ खाण्याचे अनेक फायदे... 

हिवाळ्याच्या दिवसांत आरोग्याची काळजी घेण्यासाठी काळे तीळ आणि गूळ हे एक 'सुपरफूड' मानले जाते.

थंडीच्या दिवसांत शरीराला नैसर्गिक ऊब देण्याचे आणि प्रतिकारशक्ती वाढवण्याचे काम काळे तीळ आणि गूळ यांचे मिश्रण करते.

काळे तीळ आणि गुळ दोन्ही उष्ण गुणधर्माचे असल्यामुळे शरीर गरम ठेवण्यास मदत करतात आणि थंडीचा त्रास कमी होतो.

काळ्या तिळात मुबलक कॅल्शियम आणि मॅग्नेशियम असते, ज्यामुळे हाडे मजबूत होतात आणि सांधेदुखीपासून आराम मिळतो.

काळ्या तिळांमधील कॅल्शियम आणि मॅग्नेशियम सांधे मजबूत करतात, ज्यामुळे हिवाळ्यातील सांधेदुखी कमी होते.

गुळामध्ये लोह भरपूर असते. तिळासोबत गूळ खाल्ल्याने ॲनिमियासारख्या समस्या दूर होतात आणि रक्तातील हिमोग्लोबिन वाढते.

तिळातील फायबर आणि गुळातील पाचक गुणधर्म बद्धकोष्ठतेची समस्या दूर करून पचन संस्था सुरळीत करतात.

काळ्या तिळातील अँटी-ऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन-ई मुळे हिवाळ्यात त्वचा कोरडी पडत नाही आणि केसांचे आरोग्यही सुधारते.

हिवाळ्यात सर्दी-खोकल्याचा त्रास वाढतो. तीळगूळ शरीराची इम्युनिटी मजबूत करून आजारांपासून संरक्षण करतात.

काळ्या तिळातील हेल्दी फॅट्स कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यास मदत करतात, जे हृदयाच्या आरोग्यासाठी उत्तम आहे.

Click Here