पोटदुखीवर असरदार ठरेल 'हा' चहा

पोटाच्या अनेक समस्या दूर करण्यासाठी हा चहा फायदेशीर आहे. 

पोटाच्या समस्या दूर करण्यासाठी धणे, जिरे आणि बडीशेपचा चहा सर्वोत्तम आहे. तो प्यायल्याने लवकर आराम मिळतो. 

चहा बनवण्यासाठी धणे, जिरे आणि बडीशेप घ्या. त्यात २ कप पाणी आवडीनुसार गूळ घाला. 

एका भांड्यात पाणी घाला, त्यात धणे, जिरे आणि बडीशेप घाला. ५ मिनिटे उकळवा आणि अर्धे झाल्यानंतर गाळून कोमट झाल्यावर प्या. 

याचे नियमित सेवन केल्याने पचनसंस्था मजबूत होते आणि गॅस कमी होतो. पोट हलके आणि आरामदायी वाटते. 

सकाळी रिकाम्या पोटी हा चहा पिणे फायदेशीर आहे. पण जेवणनंतर २० ते ३० मिनिटांनी सेवन केल्यास फायदा मिळतो. 

हा चहा मासिक पाळीतील वेदना कमी करतो. तसेच हार्मोन्स संतुलित राखण्यास मदत होते. 

या चहामळे कॅलरीज कमी होऊन चरबी कमी होते. चयापचय वाढतो आणि वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते. 

Click Here