हल्ली केसगळतीच्या समस्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे, जर आपले ही केस कायम गळत असतील तर हे खास तेल लावा.
केसगळती रोखण्यासाठी आपल्याला नारळाचे तेल केसांना लावावे लागेल.
नारळाचे तेल गरम करुन त्यात कढीपत्ता घाला. आणि त्याने केसांना मालिश करा.
४ चमचे नारळाच्या तेलात २ कढीपत्त्याच्या काड्या घालून शिजवा.
नंतर हे तेल गाळून आठवड्यातून दोनदा केसांच्या मुळांना लावा.
हे मिश्रण केस गळणे कमी करते आणि केसांच्या वाढीस मदत करते.
नारळाचे तेल केसांच्या मुळांपर्यंत पोहोचते आणि त्यांना आतून पोषण देते. यातील अँटी-फंगल गुणधर्म टाळू स्वच्छ ठेवतात आणि कोंडा कमी होतो.