झोपण्यापूर्वी खा 'ही' ८ फळं, लागेल शांत व गाढ झोप... 

रात्री झोपण्यापूर्वी काही फळांचा आहारात समावेश केल्याने झोपेची गुणवत्ता सुधारते...

प्रत्येकजण दिवसभर कामामुळे थकून जातो आणि रात्री शांत झोप लागणे खूप महत्त्वाचे असते. 

बऱ्याचदा काहीजणांना रात्री झोप लागत नाही, किंवा मध्येच जाग येते.

रात्री झोपण्यापूर्वी योग्य फळांचा आहारात समावेश केल्याने झोपेची गुणवत्ता सुधारते, पचनक्रिया चांगली राहते आणि सकाळी शरीर ताजेतवाने वाटते.

काही फळांमध्ये नैसर्गिक अँटिऑक्सिडंट्स, फायबर आणि झोप सुधारण्यासाठी मदत करणारे घटक असतात.

रात्री झोपण्यापूर्वी कोणती फळं खावीत आणि त्यांचे फायदे नेमके काय आहेत.

झोपण्यापूर्वी २ तास आधी २ किवी खा. यामध्ये, मेलॅटोनिन व सेरॅटोनीन असल्याने झोपेची गुणवत्ता सुधारण्यास मदत होते. 

अननस देखील खाऊ शकता. यातील पोषक तत्व शरीरातील उष्णता कमी करण्यास आणि झोप येण्याच्या प्रक्रियेला चालना देतात. 

चेरीमध्ये मेलॅटोनिन व काही पोषक अँटिऑक्सिडंट्स असतात, जे स्ट्रेस कमी करून नैसर्गिकरित्या झोप येण्यास मदत करतात. 

एवाकोडोमध्ये मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असते. जे मेंदूला शांत करून झोपेची गुणवत्ता सुधारण्यास मदत करते. 

केळ्यामध्ये मेलॅटोनिन व भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडंट्स, व्हिटामिन असतात, जे मन शांत करून झोपचे बिघडलेले चक्र सुधारण्यास मदत करतात. 

या फळांसोबतच आपण द्राक्ष, स्ट्रॉबेरी, संत्र देखील खाऊ शकता. यातील पोषक तत्व शांत व गाढ झोप लागण्यास मदत करतात .

Click Here