हिवाळ्यात मिळणारी हंगामी फळे केवळ चवीलाच उत्तम नसतात, तर ती रोगप्रतिकारक शक्तीला देखील मजबूत करतात.
हिवाळा आला की वातावरणात गारठा वाढतो आणि त्यासोबतच सर्दी, खोकला यांसारख्या आजारांचा धोकाही वाढतो.
हिवाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी नेमकी कोणती हंगामी फळं खायला हवीत ते पाहूयात.
संत्री ही व्हिटॅमिन 'सी' चा उत्तम स्रोत आहेत. थंडीत वारंवार होणाऱ्या संसर्गापासून वाचण्यासाठी संत्री खाणे अत्यंत फायदेशीर ठरते.
पेरूमध्ये फायबर आणि व्हिटॅमिन 'सी' भरपूर प्रमाणात असते. हे फळ पचनशक्ती सुधारण्यासोबतच रोगप्रतिकारक शक्तीही मजबूत करतात.
डाळिंब रक्तातील हिमोग्लोबिन वाढवण्यास मदत करते. त्यातील अँटी-ऑक्सिडंट्स शरीरातील सूज कमी करुन हृदयाचे आरोग्य जपतात.
हिवाळ्यात दररोज एक सफरचंद खाल्ल्याने हंगामी आजार दूर राहतात आणि फायबर देखील भरपूर प्रमाणात मिळते.
व्हिटॅमिन सी, ई आणि अँटीऑक्सिडंट्सयुक्त किवी इम्युनिटी मजबूत करते, पचन सुधारते आणि त्वचेला नैसर्गिक ग्लो देते.
पपईमध्ये व्हिटॅमिन ए, सी आणि पपेन एन्झाइमन पचन सुधारते, बद्धकोष्ठता दूर ठेवते इम्युनिटी वाढवते आणि त्वचा निरोगी ठेवते.
व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्सयुक्त स्ट्रॉबेरी रोगप्रतिकारक शक्ती वाढवते त्वचा तेजस्वी ठेवते आणि थकवा कमी करते.
बेरीज रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात हृदयाचे आरोग्य सुधारतात आणि त्वचा तरुण ठेवण्यास मदत करतात.