कमी वयात अकाली केस पिकतात, अशावेळी आहारात हे ५ पदार्थ खा.
हल्ली कमी वयात केस पांढरे होण्याची समस्या सतावू लागते. याचे सगळ्यात मोठे कारण चुकीची जीवनशैली.
जर आपले केसही कमी वयात पांढरे झाले असतील तर आहारात ५ पदार्थ खा.
आपल्या शरीरात मेलेनिन कमी झाले की, केस पांढरे होतात. हे आपल्या केसांना, त्वचेला आणि डोळ्यांना रंग देते. सूर्याच्या हानिकारक किरणांपासून आपले संरक्षण करते.
आपल्या आहारात हिरव्या पालेभाज्यांचा समावेश खा. यात जीवनसत्त्व, लोह आणि अँटीऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणात असते. जे त्वचेच्या पेशी दुरुस्त करण्यास मदत करते.
टोमॅटोमध्ये लायकोपिन भरपूर प्रमाणात असते. जे त्वचेला अतिनील किरणांमुळे होणाऱ्या नुकसानापासून वाचवते. मेलेनिनची पातळी राखण्यास मदत करते.
झिंक आणि व्हिटॅमिन ई ने समृद्ध असलेल्या भोपळ्याच्या बिया केसांना निरोगी ठेवतात आणि त्वचेला तणावापासून वाचवतात.
व्हिटॅमिन ई ने समृद्ध असलेले बदाम त्वचेच्या पेशींचे संरक्षण करतात. त्वचेचा पोत सुधारतात आणि कोरडेपणा दूर करतात.