चाळिशीत महिलांनी करा ५ व्यायाम, राहाल फिट! 

वयाच्या चाळिशीत महिलांनी फिट राहण्यासाठी कोणते व्यायाम करायला हवे पाहूया. 

वयाच्या चाळिशीत महिलांना हार्मोन्स संतुलित करण्यासाठी, चयापचय वाढविण्यासाठी, स्नायू आणि हाडे मजबूत करण्यासाठी मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी व्यायाम करणं महत्त्वाचं आहे. 

स्ट्रेंथ ट्रेनिंगमुळे हाडे मजूबत होतात. त्यासाठी आठवड्यातून २ ते ३ वेळा हा व्यायाम करा. 

योगासने केल्यामुळे लवचिकता, संतुलन आणि शरीराची स्थिती सुधारते. ज्यामुळे पाठदुखीचा त्रास कमी होतो. 

वेगाने चालल्यास सांध्यांवर कमी ताण येतो. तसेच हृदयाच्या आरोग्यासाठी हा उपाय चांगला आहे. 

झुंबा डान्स केल्याने शरीराची ऊर्जा वाढते. 

स्क्वॅट्स आणि लंजेस केल्याने पाय मजबूत होतात. 

पोहणे किंवा एरोबिक्स केल्यास सांधेदुखीचा त्रास कमी होतो. 

पुश-अप्समुळे शरीराच्या वरच्या भागाची ताकद वाढते. चांगल्या संतुलनासाठी हा व्यायाम आवश्यक आहे. 

Click Here