तुळशीची पाने खाल्ल्याने आरोग्याला कसा फायदा होतो पाहूया.
सकाळी दात न घासता तुळशीची पाने खाल्ल्याने शरीर नैसर्गिकरित्या तंदुरुस्त होते.
तुळशीत असणारे अँटीबॅक्टेरियल आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म तोंडातील बॅक्टेरिया नष्ट करतात.
तुळशीच्या पानांमुळे श्वासांची दुर्गंधी नष्ट होते.
रिकाम्या पोटी तुळशीची पाने चघळल्यास पोट साफ होते आणि पचनशक्ती सुधारते.
तुळस पोटातील गॅस आणि आम्लपित्त यापासूनही आराम देते.
तुळशीमुळे रोगप्रतिकारशक्ती सक्रिय करुन बॅक्टेरियांशी लढण्यास मदत होते.
तुळस डिटॉक्सिफिकेशन वाढवते आणि चेहऱ्यावर नैसर्गिक चमक आणते.