रोज १ लालचुटुक डाळिंब खाण्याचे फायदे जबरदस्त... 

डाळिंब खाण्याचे एक नाही अनेक फायदे, रोजच्या आहारात करा समावेश...

डाळिंबामध्ये लोह, पॉलीफेनोल्स, व्हिटॅमिन 'सी' आणि अनेक शक्तिशाली अँटी-ऑक्सिडंट्सचे गुणधर्म भरपूर प्रमाणात असतात. ही पोषक तत्वे शरीराला ऊर्जा  आणि निरोगी ठेवण्यासाठी आवश्यक असतात. 

डाळिंबामध्ये असलेले अँटी-ऑक्सिडंट्स कोलेस्ट्रॉल कमी करण्यास आणि रक्ताभिसरण सुधारण्यास मदत करतात. यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो. 

डाळिंबामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते. हे पचनक्रिया सुधारण्यास, बद्धकोष्ठता दूर करण्यास आणि आतड्यांचे आरोग्य उत्तम राखण्यास मदत करते.

डाळिंबामध्ये व्हिटॅमिन 'सी' भरपूर असते, जे त्वचेतील कोलाजन वाढवून लवचिकता टिकवून ठेवते. पिंपल्स आणि काळे डागही कमी करते. 

डाळिंब लोहाचा उत्तम स्त्रोत आहे. हे शरीरातील हीमोग्लोबिनची पातळी वाढवण्यास आणि लाल रक्तपेशींच्या निर्मितीस मदत करते. 

डाळिंबातील 'अँटी-इन्फ्लेमेटरी' गुणधर्म शरीरातील सूज कमी करण्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतात.

Click Here