चहामध्ये तुळशीची पाने घालून असा चहा हिवाळ्यात पिणे आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर ठरते.
हिवाळ्यात साध्या चहामध्ये फक्त तुळशीची काही पाने घालून प्यायल्यास, चहा चविष्ट तर लागतो सोबतच शरीराला अनेक आरोग्यदायी फायदेही देतो.
हिवाळ्यात दररोज तुळशीचा चहा प्यायल्यास शरीर आतून ऊबदार राहते आणि हिवाळ्यातील लहान - सहान आजारांपासून बचाव होतो.
तुळशीमध्ये अँटिऑक्सिडंट, अँटी-इंफ्लॅमेटरी आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असल्याने सर्दी, खोकला आणि कफ त्वरित कमी होतो.
तुळशीचा चहा पोटातील गॅस, पोट फुगणे, बद्धकोष्ठता कमी करण्यास मदत करतो.
तुळशी मानसिक शांतता देणारी खास वनस्पती आहे, जी कॉर्टिसोल हार्मोन नियंत्रित करून तणाव कमी करते आणि ऊर्जा व एकाग्रता वाढवते.
तुळशीच्या पानांतील 'व्हिटॅमिन सी' आणि झिंकमुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती अनेक पटीने वाढते.
थंडीत शरीराला आतून गरम आणि ऊबदार ठेवण्यासाठी हा चहा नैसर्गिक उष्णता देतो.
तुळस ब्लड शुगर लेव्हल नियंत्रणात ठेवण्यास मदत करते, ज्यामुळे मधुमेहींना याचा फायदा होतो.
पाणी उकळवा, त्यात ४ ते ५ तुळशीची पाने घाला, चहा पावडर, आले, गूळ घालून उकळी आणा व गरमागरम पिण्यासाठी सर्व्ह करा.