चेहऱ्यावर बर्फ लावल्याने कसा फायदा होतो जाणून घेऊया.
चेहऱ्यावर बर्फ लावल्याने त्वचेवरील सूज कमी होते. यामुळे चेहऱ्यावर चमक येते.
बर्फ आपल्या त्वचेवरील ओपन पोअर्स अधिक घट्ट करण्यास मदत करते.
बर्फाचा पॅक त्वचेवर लावल्यास थंडावा मिळतो. तसेच चेहऱ्यावरील सुरकुत्या देखील कमी होतात.
जर मुरुमांमुळे त्वचेवर रॅशेस आले असतील तर बर्फ लावायला हवा. इतकेच नाही तर पिंपल्सची जळजळ देखील कमी होते.
मेकअप करण्यापूर्वी बर्फ लावल्याने दीर्घकाळ टिकण्यास मदत होते.
उन्हामुळे त्वचेवर टॅनिंग आले असेल तर बर्फ चोळायला हवा.