केस वाढवण्यापासून कोंडा कमी करण्यापर्यंत अळशीच्या बियांचा उपयोग कसा होतो पाहूया.
अळशीच्या बियांपासून जेल बनवले जाते जे केसांना मुळांपासून टोकांपर्यंत लावता येते.
या बियांमुळे केसांची वाढ होण्यास मदत होते. तसेच पातळ झालेले केस दाट होतात.
नियमितपणे याचा हेअर पॅक वापरल्यास केसांच गळणं आणि तुटणं कमी होते.
कोंडा दूर करण्यासाठी अळशीच्या बिया देखील खूप फायदेशीर ठरतात.
अळशीच्या बियांमध्ये असलेल्या ओमेगा-3 फॅटी ॲसिडमुळे केस गळणे कमी होते.
अळशीच्या बियांचे जेल केसांना नैसर्गिक चमक देते.