फेकून न देता, केळीची साल त्वचेसाठी 'अशी' वापरा... 

केळं खाल्ल्यानंतर त्याची साल फेकून देतो, पण हीच साल त्वचेसाठी नैसर्गिक ब्यूटी टॉनिक ठरू शकते. 

केळीच्या सालीत अँटिऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स असतात जे त्वचेचा चमकदारपणा वाढवतात, डाग कमी करतात आणि त्वचा मऊ व तजेलदार करतात. 

केळीच्या सालीमध्ये असलेले व्हिटॅमिन 'सी' आणि अँटीऑक्सिडंट्स त्वचेला नैसर्गिकरित्या उजळवते आणि चमकदारपणा देते. 

केळीच्या साल पिंपल्सवर हलकेच चोळून लावल्याने सूज कमी होते आणि डाग जाण्यास मदत होते.

केळीच्या सालीमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स सुरकुत्या आणि बारीक रेषा कमी करते ज्यामुळे त्वचा तरुण दिसू लागते.

केळीच्या सालीतील पोषक घटक त्वचेला पुरेसा ओलावा देतात, ज्यामुळे त्वचा मऊ आणि मुलायम होते. 

केळीच्या साल सनबर्नमुळे होणारी जळजळ, लालसरपणा शांत करते, कारण त्यात असलेले घटक त्वचेला आराम देतात.

केळीच्या सालीतील नैसर्गिक तेल आणि पोटॅशियम त्वचेला पोषण देतात.

केळीची साल स्वच्छ धुवून आतल्या बाजूने चेहऱ्यावर  ५ ते १० मिनिटं हळूवार चोळा आणि कोमट पाण्याने धुवा.

Click Here