आरोग्याच्या 'या' तक्रारी असतील तर मटार खाणे पडेल महागात...
हिवाळा म्हणजे हिरव्यागार मटारचे वेगवेगळे पदार्थ मोठ्या आवडीने खाल्ले जातात, पण मटार कुणी खाऊ नये ते पाहा...
हिवाळा म्हणजे हिरवेगार, ताजे आणि गोड मटारचे वेगवेगळे पदार्थ खाण्याचा खास सिझन...
मटारमध्ये प्रोटीन्स, फायबर, व्हिटॅमिन्स आणि अँटिऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असल्याने तो आरोग्यासाठी उत्तम मानला जातो.
परंतु काही विशिष्ट आरोग्याच्या तक्रारी किंवा शारीरिक समस्या असलेल्यांसाठी पौष्टिक मटार खाणे त्रासदायक ठरू शकतात.
मटारमध्ये प्रोटीन आणि पोटॅशियम अधिक प्रमाणात असते, त्यामुळे ज्यांची किडनी कमकुवत आहे त्यांनी मटार योग्य प्रमाणातच खावेत.
प्रोटीन आणि कार्बोहायड्रेट्स अधिक प्रमाणात असल्याने, जास्त मटार खाल्ल्याने वजन वाढू शकते. त्यामुळे ते मर्यादित प्रमाणातच खावे.
मटारमध्ये फायबर असते, जे पचायला वेळ लागतो, ज्यामुळे गॅस - अॅसिडीटीचा त्रास होऊ शकतो.
ज्यांचे युरिक अॅसिड वाढलेले असते त्यांनी मटार खाणे टाळावे. मटारमध्ये प्युरिन असते, जे शरीरात युरिक अॅसिड वाढवू शकते.
काहीजणांना चणा, मूग, सोयाबीन यांची ॲलर्जी असते. अशा काहीजणांना मटारमुळे देखील पुरळ, रॅश, खाज किंवा सूज येऊन ॲलर्जी होऊ शकते. जर तुम्हाला पूर्वी अशी रिॲक्शन झाली असेल, तर मटार खाणे टाळा.