हिवाळ्यात ५ गोष्टी करणं टाळा- त्वचेचं होईल नुकसान

हिवाळ्यात त्वचा मऊ, हायड्रेटेड ठेवायची असेल तर काही गोष्टी करणं पुर्णपणे टाळायलाच हवं.

हिवाळ्यात त्वचा खूप ड्राय होते. त्यामुळे अशावेळी त्वचेवर कोणतेही हार्ड फेसवॉश लावणे टाळायला हवे.

थंडी घालविण्यासाठी अनेकजण हिवाळ्यात कडक पाण्याने आंघोळ करतात. पण त्यामुळे तेवढ्यापुरतं बरं वाटत असलं तरी त्वचा मात्र जास्त कोरडी होत जाते.

चेहरा धुतल्यानंतर तो पुर्णपणे कोरडा करून मग मॉईश्चरायजर लावू नका. त्वचा थोडी ओलसर असतानाच मॉईश्चरायजर लावा. जेणेकरून ते त्वचेमध्ये व्यवस्थित मुरलं जाईल. 

हिवाळ्यात त्वचा खूप जास्त संवेदनशील झालेली असते. त्यामुळे तिच्यावर स्क्रबिंगचा खूप मारा करू नये. त्वचेचं नुकसान होतं.

हिवाळ्यात फेस ऑईल वापरण्यापेक्षा माॅईश्चरायजिंग क्रिम लावण्यावरच भर दिला पाहिजे. 

Click Here