हिवाळ्यात त्वचेसाठी साजूक तूप म्हणजे अमृत... 

हिवाळ्यात रोज ५ मिनिटे साजूक तुपाने त्वचेला मालिश केल्यास मिळणारे आश्चर्यकारक फायदे...

तूप हे नैसर्गिक फॅटी अ‍ॅसिडयुक्त असते, जे त्वचेला दीर्घकाळ ओलावा टिकवून ठेवण्यास मदत करते.

रोज त्वचेला तुपाने मालिश केल्यास रक्तभिसरण सुधारते आणि चेहऱ्यावर नैसर्गिक व सुंदर चमक येते.

तुपामध्ये असलेले व्हिटॅमिन 'ई' त्वचेला पोषण देते आणि सुरकुत्या व बारीक रेषा कमी करण्यास मदत करते.

कोरड्या आणि फाटलेल्या ओठांवर रात्री तूप लावून झोपल्यास ते मऊ आणि गुलाबी होतात.

डोळ्यांभोवती हलक्या हाताने तुपाने मसाज केल्यास डार्क सर्कल्स कमी होण्यास मदत होते.

हिवाळ्यात त्वचेला तुपाने मसाज केल्यास पिग्मेंटेशन आणि डार्क स्पॉट्स कमी होण्यास मदत होते. 

थंडीमुळे खूप कोरडी व खरखरीत झालेली त्वचा मऊ व नरम करते. 

तूप हे सौम्य आणि रसायनमुक्त असल्याने संवेदनशील त्वचेसाठीही उपयुक्त ठरते फक्त तेलकट त्वचा असेल तर वापरणे टाळावे.

Click Here