प्रोटीन्स मिळविण्यासाठी बदाम खावे की अक्रोड खावे? असा प्रश्न पडला असेल तर....
बहुतांश लोकांच्या दिवसाची सुरुवात पाण्यात भिजवलेले बदाम आणि अक्रोड खाऊन होते.
शरीरातली प्रोटीन्सची कमतरता भरून काढण्यासाठी हे पदार्थ खातात. पण त्यापैकी नेमकं कशातून जास्त प्रोटीन्स मिळतं ते समजत नाही.
काही अभ्यासावरून असं दिसून आलं आहे की साधारण एक मुठभर बदाम तुम्ही खाल्ले तर त्यातून ६ ग्रॅम एवढे प्रोटीन्स मिळतात.
तर तेवढ्याच प्रमाणात जर अक्रोड खाल्ले तर त्यातून ४ ग्रॅम प्रोटीन्स मिळतात.
बदामामधून प्रोटीन्स जास्त मिळतात तर अक्रोडमधून ओमेगा ३ जास्त मिळते.
म्हणूनच बदाम आणि अक्रोड हे दोन्हीही एकत्र करून खाणे आरोग्यासाठी जास्त चांगले मानले जाते.