शूटिंगच्या धावपळीतून वेळ काढून या अभिनेत्री स्वयंपाक करणे मनापासून एन्जॉय करतात.
पडद्यामागे मास्टरशेफची भूमिका निभावणाऱ्या बॉलिवूडमधील 'फूडिज' अभिनेत्री नेमक्या कोण ते पाहा...
दीपिका पदुकोण उत्तम कुक आहे. तिला खास करून इटालियन पदार्थ खूप आवडतात. पास्ता, रिसोट्टो आणि वेगवेगळे सॅलड्स ती अगदी परफेक्ट बनवते.
करीनाला हेल्दी आणि घरगुती जेवण बनवायला खूप आवडते. ती स्वतःसाठी सोप्या, पौष्टिक रेसिपीज बनवून सोशल मीडियावरही शेअर करते.
आलिया भट्टला बेकिंगची आवड आहे, ती खास करून कुकीज, केक आणि ब्रेड यांसारखे पदार्थ अगदी उत्तम बनवते.
शिल्पा शेट्टीला हेल्दी आणि पौष्टिक पदार्थ बनवायला आवडतात, पदार्थ चविष्ट आणि पौष्टिक कसे बनवायचे यासाठी ती नेहमीच नवनवीन प्रयोग करते.
मलायका अरोरा हेल्दी लाइफस्टाईलसोबत कुकिंग देखील तिची आवड आहे. ग्रीन स्मूदी, हेल्दी स्नॅक्स आणि डाएट फ्रेंडली पदार्थ बनवणे तिला आवडते.
कंगनाला पारंपरिक भारतीय पदार्थ बनवायला आवडतात. शूटिंगमधून वेळ मिळाला की ती स्वतः स्वयंपाक करते, असे तिने अनेक मुलाखतींमध्ये सांगितले आहे.
ऐश्वर्याला तिच्या मूळ मंगलोरियन खाद्यसंस्कृतीची प्रचंड ओढ आहे. तिला पारंपारिक फिश करी आणि चिकन सुक्का यांसारखे पदार्थ बनवायला खूप आवडतात.
जेनेलियाला घरगुती आणि पौष्टिक जेवण बनवायला आवडते, विशेषतः तिला व्हेज रेसिपीजमध्ये नवनवीन प्रयोग करायला आवडतात.
तापसी खूपच 'फूडी' आहे आणि तिला पराठे आणि विविध प्रकारचे उत्तर भारतीय पदार्थ तयार करता येतात.
कतरिनाला बेकिंगची देखील आवड असून ती अनेकदा केक आणि कुकीज मोठ्या हौसेने करते.