बॉलिवूडमधील अभिनेत्रींनी प्रेग्नंन्सीत, ,चेहऱ्यावरचा 'प्रेग्नन्सी ग्लो' आणि बेबी बंप मिरवत मॅटर्निटी फोटोशूट केले.
आपल्या प्रेग्नन्सीत मॅटर्निटी फोटोशूट केलेल्या बॉलिवूड अभिनेत्री कोण ते पाहा...
'बेबो'ने दोन्ही प्रेग्नन्सीत आपल्या फॅशनने चाहत्यांना चकित केले. मॅटर्निटी फोटोशूटमध्ये तिचे योगा आणि जिम लूक्स खूप गाजले.
आलियाने प्रेग्नन्सीदरम्यान केलेले फोटोशूट अतिशय क्लासी होते. तिच्या चेहऱ्यावरचा मातृत्वाचा आनंद स्पष्ट दिसत होता.
बिपाशाने पती करण सिंग ग्रोवरसोबत केलेले मॅटर्निटी फोटोशूट सोशल मीडियावर व्हायरल झाले. बोल्ड, आत्मविश्वासपूर्ण आणि प्रेमळ असा तिचा लूक चाहत्यांना खूप आवडला.
सोनम कपूरने फॅशन-फॉरवर्ड मॅटर्निटी फोटोशूट करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. साडी, गाऊन आणि स्टायलिश आऊटफिट्समध्ये तिचा लूक खूपच एलिगंट होता.
अनुष्काने साध्या पण एलिगंट स्टाईलमध्ये मॅटर्निटी फोटोशूट केले. नॅचरल ग्लो आणि शांत आत्मविश्वासामुळे तिचे फोटो खूपच चर्चेत होते.
जिनिलिया देशमुख हिच्या मॅटर्निटी फोटोशूटची चर्चा नेहमीच तिच्या साधेपणामुळे आणि 'क्यूट' लूकमुळे झाली.
राधिका आपटेच्या प्रेग्नन्सी फोटोशूटमध्ये तिची एक वेगळी आणि 'बोल्ड' स्टाईल पाहायला मिळते.