बॉलिवूडमध्ये अशा काही अभिनेत्री आहेत ज्या वयाच्या चाळीशी नंतर प्रेग्नेंट झाल्या आणि आई होण्याचा आनंद अनुभवला.
शिल्पा शेट्टीने वयाच्या ४० व्या वर्षी सरोगसीच्या माध्यमातून दुसऱ्या बाळाला (समीशा) जन्म दिला.
करीनाने आपल्या दुसऱ्या मुलाला ४० व्या वर्षी जन्म दिला. चाळीशीनंतर प्रेग्नेंट झाल्यावरही ती सतत काम करत राहिली.
फराह खानने वयाच्या ४३ व्या वर्षी आयव्हीएफ (IVF) तंत्रज्ञानाच्या मदतीने तिळ्यांना (Triplets) जन्म दिला.
अमृता सिंग वयाच्या ४० व्या वर्षी मुलगा इब्राहिम अली खान याची आई झाली.
बिपाशा बसूने वयाच्या ४३ व्या वर्षी देवीला (Devi) जन्म दिला. उशिरा मातृत्व स्वीकारणाऱ्या अभिनेत्रींपैकीच ती एक.
नेहा धुपिया वयाच्या चाळीसाव्या वर्षी दुसऱ्यांदा आई झाली.
सेलिना जेटलीने वयाच्या ४० व्या वर्षी दुसऱ्यांदा जुळ्या मुलांना जन्म दिला.
कतरीनाने नुकतेच प्रेग्नेंट असल्याची गुडन्यूज दिली, तिचे वय आता ४२ असून ती पहिल्यांदा आई होणार आहे.
सोनम कपूर ही देखील वयाची चाळीशी ओलांडल्यानंतर आता दुसऱ्या बाळाची आई होणार असल्याचे तिने संगितले.