'ही' अभिनेत्री विकतेय चक्क पाणी... 

अभिनेत्री झाली बिझनेसवूमन, बहिणीसोबत विकतेय पाणी, किंमत जाणून व्हाल थक्क 

बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनय कौशल्याने सर्वांना भूरळ घालणारी अभिनेत्री भूमी पेडणेकरने स्वत:चा व्यवसाय सुरु केला आहे. 

तिने तिची बहीण समीक्षा पेडणेकरसोबत 'बॅकबेलाइफ' नावाचा ब्रँड सुरु केला आहे. हा ब्रँड प्रीमियम पाण्याचा आहे. 

तिने दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले हे पाणी हिमालय पर्वतांमधून घेतले जाईल, ज्यात भरपूर खनिजे असतील. 

ती म्हणते की, हिमालच प्रदेशात स्वत:चा कारखाना उघडला आहे, ज्यामुळे महिलांना काम मिळेल. दिवसाला ४५००० बॉक्स बनवण्याची क्षमता आहे.

तिने या पाण्याचे पॅकेजिंग निसर्गाला लक्षात ठेवून केले आहे. ही बाटली प्लास्टकची नसून कागदी पुठ्ठ्याची आहे. जी नंतर रिसायकल करता येईल. 

यात असणारे पाणी उत्तम दर्जाचे आहे, जे कोणीही खरेदी करु शकते. 

७५० मिली बाटलीची किंमत २०० रुपये तर ५०० मिली बाटलीची किंमत १५० रुपये ठेवण्यात आली आहे. 

Click Here